बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.(Recruitment) सरकारी बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब अँड सिंध बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी punjabandsind.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

या भरती मोहिमेत १०० पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ही (Recruitment) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ मार्च २०२६ रोजी सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, महाराष्ट्रात एकूण ६० पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचं सोनं करावं.
पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी (Recruitment) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कोणत्याही बँकेत कामाचा १८ महिन्यांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.पंजाब अँड सिंध बँकेत JMGS I ऑफिसर पदावर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू आणि लोकल भाषा टेस्टद्वारे निवड होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ₹48480-₹85920 पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
हेही वाचा :
पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी