जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर आता विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या (politics) निवडणुकीआधी सांगलीतील राजकारण तापलं आहे. सांगलीत दोन पाटील आमनेसामने आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांना लक्ष्य केलं. जिथे जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचा, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील (politics) यांच्यावर निशाणा साधल्यानं सांगलीतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. जयंत पाटील यांचा इतिहास आहे. जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचा, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांच्यात देखील जयंत पाटलांनीच बिब्बा टाकला, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

पडळकरांकडून शिवसेना शिंदे गटाचे आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा (politics) परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या बोगस कुणबी प्रमाणपत्र कारवाईच्या मागणीला पाठिंबा देत, जर बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर संबंधित जात पडताळणी अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडीमध्ये चमत्कार होईल. पिक्चर अभी बाकी आहे, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या (politics) विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवड उद्या बुधवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी सांगली जिल्हा परिषद सदस्यांची सांगलीत बैठक घेतली. या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना विविध सूचना केल्या आहेत.

हेही वाचा :

फिलीपाईन्समध्ये आणीबाणी, इराण संघर्षाने कुठे लॉकडाऊन तर कुठे विमान सेवा बंद

घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार

देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *