अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे.(contest) त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित झालेय. पण आता त्यांच्याविरोधात ३ जणांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण हे तिन्ही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाहीत. जत, सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती मिळाली.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच (contest) दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, स्थानिक पातळीवरून एकही अर्ज न येता थेट बाहेरील इच्छुक उमेदवारांनी उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार,बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून,4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच (contest)राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाही. जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टीकडून,सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणा-कोणाचा अर्ज कायम राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता पहिल्याच दिवशी ३ अर्ज आल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत आता कोण कोण मैदानात असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक