राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आजही पावसाचा ऑंरेज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे.(rain) त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात आज गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाला पोषक हवामान राज्यात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज गारपिट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. उष्णता देखील काही भागात वाढण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सतत हवामानात बदल होत आहे.
मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरूवात झाली. मात्र, तरीही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे. (rain) धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस झाला. धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून या पावसानं द्राक्ष आंबा, केळी या फळ पिकासह ज्वारी व काढणीला आलेला गहू देखील मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा-वीस दिवसाच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊससह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतातील बिजवाई कांदा, गहू आणि ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. (rain) वाऱ्याच्या वेगामुळे पिके आडवी पडण्याचा धोका निर्माण झाला असून, काढणीच्या टप्प्यातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
हेही वाचा :
जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक
गुगलचं मोठं अपडेट, आता जीमेलमध्ये करु शकता ‘हा’ महत्त्वाचा बदल