कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
विशिष्ठ प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की,”पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची?(situation)”असे म्हटले जाते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रावर ढगफुटी सदृश्य सुरू असलेल्या अति कोसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांचीशेकडो गावांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. चार लाखापेक्षाही अधिक हेक्टर जमिनीवरील उभे पीक एक तर झोपले आहे किंवा वाहून गेले आहे. जीवित हानी झाली आहे आणि वित्त हानीही झाली आहे. राज्यातील जिल्हा निहाय आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांकडून पूरग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.अशा प्रकारचे अस्मानी संकट येते तेव्हा कमीत कमी वित्त आणि जीवित हानी होईल याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन कसे करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.

मुंबई आणि आसपासची महानगरे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ उत्तर महाराष्ट्र येथे काही अपवाद सोडले तर जलप्रलय सदृश्य गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास एक हजार पेक्षा अधिक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड सारख्या जिल्ह्यात लष्कराला पाचारण करावे लागले आहे. अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाली आहे विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी 200 ते 300 मिलिमीटर पावसाची नोंद काही तासात झाली आहे.(situation) मुंबई शहराची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती.
मुंबई शहरातील बहुतेक रस्त्यांचे रूपांतर पावसाळी नद्यांमध्ये झाले होते. हीच परिस्थिती राज्यातील अनेक महानगरांमध्ये पाहायला मिळत होती. या अस्मानी संकटात जीवित हानी झाली, पण त्याचबरोबर अनेकांचे प्राणही वाचवले गेले. पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी स्थानिक लोकांच्या बरोबरच आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांकडिल जवानांची तसेच एन डी आर एफ जवानांची मोलाची मदत झाली. यंदाचा पावसाळा सुरू झाला तेव्हा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिके उगवली, ती जोमाने वाढली, शेतकरी खुश होता पण या अस्मानी संकटात सुमारे चार लाख हेक्टर शेत जमिनीवरील उभी पिके नष्ट झाली. बळीराजाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून बळीराजाला भरपाई मिळेल पण ती पुरेशी नसेल.
दक्षिण महाराष्ट्राला जलप्रलयात लोटणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी या धरणाचा धोका यंदाच्या पावसाळ्यातही कायम आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये कोसळधारा सुरू असल्या तरी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. कोल्हापूरची पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पात्रा बाहेर पडली आहे. जिल्ह्यातील 80 पेक्षा अधिक बंधारे खाण्याखाली गेल्यामुळे काही ठिकाणी जिल्हा मार्ग तर काही ठिकाणी राज्य महामार्ग येथे नद्यांचे पाणी आल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक बनणारे पाण्याखाली जातात तेव्हा पुरस्थिती गंभीर होते. सध्या पंचगंगा नदी इशारा पातळीकडे धावत आहे. ती केव्हाही धोका पातळीपर्यंत पोहोचू शकते असे सध्याचे वातावरण आहे.

दरवर्षीच नेमीची पावसाळा येतो. तो कधी कधी सरासरी तर कधी सरासरी पेक्षा जास्त पडतो. इसवी सन 1989, 2005, 2019, 2021 अशा चार वेळेला कोल्हापूर सह दक्षिण महाराष्ट्र पाण्याखाली गेला होता. अपरिमित नुकसान झाले होते. जीवित हानीही झाली होती. गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा अचूक अंदाज करण्याइतकी यंत्रणा विकसित झाली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रेड अलर्ट, ऑरेंज ॲलर्ट, येलो अलर्ट दिला जातो.(situation)ढगफुटी सदृश्य पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याच्या आधी तीन ते चार तास अंदाज बांधता येत असल्यामुळे किमान पातळीवर सुरक्षित स्थळी जाता येतअस्मानी संकटाची तीव्रता वाढवण्याला माणूसही तितकाच जबाबदार आहे.शंहरे,महानगरे येथे सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था असते पण त्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले की पावसाचे पाणी तुंबते. ड्रेनेज तुंबण्यामागे प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर कारणभूत ठरतो.
महानगरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप जे आले त्याला कारण ड्रेनेज व्यवस्थेतील अडथळे आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्वच ठिकाणी नालेसफाई केली जाते. यंदाही ती करण्यात येत होती पण त्याचवेळी मे महिन्यातच पावसाने दणका दिल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नाल्यातील ओढ्यातील गाळ काढण्यात अडचणी आल्या. त्यामुळे यंदाचे अस्मानी संकट गंभीर बनले. मुंबई, आणि आसपासची शहरे, तसेच राज्यातील महानगरे येथील मूलभूत पायाभूत सुविधांवर लोकसंख्या वाढीमुळे ताण पडतो आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही त्या तुलनेत कमी पडते आहे.
मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत आणि त्यामुळे पूर संकटाची तीव्रता वाढली आहे. ज्या प्रमाणात बांधकाम त्याच प्रमाणात पाणी वाढणार हा निसर्ग शास्त्राचा नियम आहे. आणि त्याचाच फटका दर पावसाळ्यात बसतो आहे. पुराचे पाणी, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे वळवण्याचा एक मोठा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्यातून होणार आहे. पण त्यामुळे पूर संकट दूर होणार काय हे हा भव्य प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच समजून येणार आहे. तोपर्यंत तरी जलप्रलय सदृश्य स्थिती निर्माण होते तेव्हा कमीत कमी नुकसान व्हावे अशा प्रकारची उपाययोजना केली पाहिजे. जलप्रलय सदृश्य परिस्थिती निर्माण कशामुळे होते याचा अभ्यास तज्ञांच्या कडून झालेला आहे. त्याचाही प्रशासनाने विचार केला पाहिजे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; बाळ दगावलं