रात्रभर पावसाची रिपरिप कायम असल्यामुळे आज सकाळी पंचगंगा(river) नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे धाव घेतली आहे. सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगेची पाणी पातळी ४० फूट एक इंचावर पोहचली आहे. ३९ फूट इशारा तर ४३ फूट धोक्याची पातळी आहे. राधानगरी धरण क्षेत्रातील पाऊस ओसरल्यामुळे स्वयंचलित ७ दरवाजा पैकी चार दरवाजे बंद झाले आहेत. अलमट्टी धरणाचा विसर्ग सकाळी नऊ वाजल्या पासून २ लाख वरून अडीच लाख क्युसेक्स करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासांत सरासरी ३२ मिलीमिटर पाऊस झाला असून गगनबावडा तालुक्यात १०९ पाऊस झाला आहे.

गेली तीन दिवस सलग पाऊसाचा जोर वाढत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने महापुकाकडे धाव घेतली आहे. राधानगरी धरण क्षेतातील चार दरवाजे बंद झाले असले तरीही तीन, सहा आणि सात ही उघडलेले आहेत. त्यामधून ४ हजार २८४ क्युसेक्स तर पॉवर हाऊस मधून दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.(river) त्यामुळे पंचगंगा नदी पात्राच्या पाण्यात वाढ होत आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
आज सकाळी काही प्रमाणात पावसाची उघडीप होती. त्यामुळे आज दिवसभरात उघडीप मिळेल असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा रिपरिप सुरूच ठेवली आहे. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी पहाटे पाच वाजता ३९ फूटावर पोहचली. त्यामुळे इशारा पातळीकडे पंचगंगा जात असल्याने जिल्हा प्रशासनासह महापालिका पथक पूरस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.
मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?
इशारा पातळीकडील पंचगंगा सकाळी दहा वाजता ४० फुटावर पोहचली आहे. त्यामुळे तीने धोक्याच्या पातळीकडे धोका पातळीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (river)पंचगंगेतील राजाराम बंधाऱ्यातून ५९६८२ क्युकेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राधानगरी ५७८४, दूधगंगा काळम्मावाडी २५०००, वारणा ३९६६३, कोयणा ९५३००, अलमट्टी २लाख ५० हजार, हिप्परगी ८२ हजार ८०० क्युसेक्स विसर्ग आता सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील बहे, बोरगाव, नागठाणे, डिग्रज, सांगली, म्हैशाळ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारे पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय