महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत.(calls)उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अचानक दिल्ली गेल्या होत्या. तिथे अमित शहा यांची भेट घेतली अशी चर्चा आहे. तसंच सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे नाराज असल्याचा सूर आहे. तरदुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय. (calls)बारातमती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलीये. सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांनाही पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती मिळतीये. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. सुनेत्रा पवार सोमवारी 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत.महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याचे बोलं जातंय.
महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा (calls) द्यायचा कि बारामती पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा ?, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दरम्यान राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देण्यासंबंधी आधी काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी फारशी चर्चा महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी न करता काँग्रेसने भूमिका जाहीर करून मग पक्षाशी चर्चा करताना दिसत आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली अशी माहिती आहे. या सगळ्यांमध्ये काँग्रेस पक्ष सोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा :
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत
शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप