राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ऑनलाइन पद्धतीने चेक करा.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. नमो शेतकरी योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना ८ हप्ते देण्यात आले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठवा हप्ता नुकताच देण्यात आला. (farmers) दरम्यान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी ८९ लाख ७४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक २००० रुपये जमा केले आहेत. यासाठी १७९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला आहेत. या योजनेत तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्टेट्‍स चेक करायचा आहे.
या योजनेसाठी https://nsmny.mahait.org/ वेबसाइटवर जा.
यानंतर तुम्हाला बेनिफिअरी स्टेट्सवर क्लिक करा.
त्यावर तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकावा.
यानंतर कॅप्चा कोड भरा.
यानंतर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा. (farmers) यानंतर सबमिटवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याबाबत माहिती मिळणार आहे. तुमचा स्टेट्‍स तुम्हाला दिसणार आहे.पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कळणार आहे. तुमच्या बँकेत पैसे जमा झाल्यावर लगेच मेसेज येणार आहे. तुम्ही तुमच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन पैसे आले की नाही चेक करु शकतात. (farmers) याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही पासबुकवर एन्ट्री करु शकतात. त्यावरुन पैसे आले की नाही हे समजणार आहे.

हेही वाचा :

आता OTP विना व्यवहार, फसवणूक रोखण्यासाठी RBI चा रामबाण उपाय, ऑनलाईन फसवणुकीला आळा

तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही,

गॅस सिलिंडरवरून कडाक्याचे भांडण, नवऱ्याने ९ महिन्यांच्या गरोदर बायकोची केली हत्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *