मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड–अकिवाट तिहेरी रस्त्यावर (villages) असलेल्या ऐतिहासिक वडाच्या झाडावरून शुक्रवारी सकाळी दोन गावांतील ग्रामस्थ आमने-सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अपघात होत असल्याचा मुद्दा पुढे करत बस्तवाड ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेत झाड तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मजरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा प्रयत्न रोखून धरला.सदर वडाचे झाड सुमारे १५० ते २०० वर्षे जुने असून गावाच्या परंपरा आणि श्रद्धेशी घट्ट जोडलेले आहे. दरवर्षी विजयादशमीला या वटवृक्षाजवळ दसरा महोत्सव साजरा केला जात असल्याने ग्रामस्थांच्या भावना या झाडाशी निगडित आहेत.

त्यामुळे झाड तोडण्याऐवजी अपघात टाळण्यासाठी गतिरोधक,(villages) झेब्रा क्रॉसिंग, तसेच दिशादर्शक फलक उभारावेत, असा पर्याय मजरेवाडी ग्रामस्थांनी सुचवत झाड तोडण्यास स्पष्ट नकार दिला.दरम्यान, बस्तवाड ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली असली तरी मजरेवाडी ग्रामपंचायतीशी कोणताही पत्रव्यवहार किंवा ‘ना हरकत’ घेतलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्वपरवानगी आवश्यक असताना दिलेली ही मंजुरी बेकायदेशीर असल्याने ती तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली.

घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी (villages)उपस्थित नसताना बस्तवाड ग्रामस्थांनी क्रेन व कटरच्या सहाय्याने झाड तोडण्याचा प्रयत्न केल्याने वाद अधिकच चिघळला. शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला जात असताना अशा प्रकारे झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. उपसरपंच किशोर जोगळे यांनी, परवानगी रद्द न झाल्यास संबंधितांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत तक्रार देऊन न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला.दुसरीकडे, बस्तवाड, राजापूर व अकिवाट येथील नागरिक या मार्गाचा जवळचा पर्याय म्हणून वापर करतात. मात्र या चौकात झाडामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने आतापर्यंत १० ते ११ अपघात झाल्याचा दावा बस्तवाड ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी झाड हटवणे अत्यावश्यक असल्याची त्यांची भूमिका आहे.

झाड तोडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. (villages) “झाड तोडणारच” असा निर्धार बस्तवाडकरांनी व्यक्त केला, तर “ऐतिहासिक परंपरा खंडित होऊ देणार नाही” अशी ठाम भूमिका मजरेवाडीकरांनी घेतल्याने वातावरण अधिकच तापले. दुपारपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहिली.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. पोलिस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली तरी या प्रकरणामुळे दोन्ही गावांमध्ये अद्यापही तणाव कायम असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *