राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. (conspiracy) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कडू यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजकीय वैमनस्यातून अपघात घडवून आपला जीव घेण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे.

या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू (conspiracy) यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाही,” असे सांगत त्यांनी हा प्रकार आपल्याला बदनाम करण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला. तसेच शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांच्या प्रोत्साहनासाठी आंदोलन उभारण्याच्या तयारीत असताना आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना कडू यांनी इशाराही दिला की, जर अशा प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, (conspiracy) तर ते स्वतःहून अटक देण्यास तयार आहेत. “आम्ही प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक करून घेऊ,” असे ते म्हणाले. तसेच ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात नेमके काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील

हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबई इंडियन्स या स्थानी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *