सध्या देशभरातून अनैतिक संबंधाच्या अनेक घटना कानावर येतात.(relationship) कधी जावयासोबत सासू पळून जाते तर कधी सासऱ्याचा डोळा सूनेवर असतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये तर अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. नुकताच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बायकोचे तिच्या जावयाशी आणि भावोजीशी अनैतिक संबध होते. याबाबत जेव्हा तिच्या नवऱ्याला कळाले तेव्हा त्या धक्काच बसला. पण नंतर जे काही घडलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया…

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हादरवणारी घटना घडली आहे. मुरलीगंज पोलीस ठाण्यात उर्मिला देवी नावाची एक महिला तक्रार घेऊन पोहोचली. तिने सांगितले की, तिचा मुलगा जसवंत यादव आणि सून पुनीता देवी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता.(relationship) याच दरम्यान, पुनीताचे तिचा जावई अमित कुमार आणि भावोजी राजेश यादव यांच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले. जसवंत या नात्यांचा विरोध करत होता. यामुळे वैतागलेल्या पुनीताने तिच्या प्रियकरांसोबत मिळून नवऱ्याची हत्या घडवून आणली. उर्मिला देवी ही पुनीताची सासू होती.
सासूने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, पुनीताने आपल्या 12-13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिचा प्रियकर अमितशी लावून दिले. एवढेच नाही, तर ती सतत एक बीघा जमीन अमितच्या नावावर नोंदवण्यासाठी दबाव टाकत होती. जेव्हा जसवंतने जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा पुनीताने हत्येचा कट रचला.17 ऑगस्टच्या रात्री सुमारे 9 वाजता पुनीताने अमित, तिचा भावोजी राजेश यादव आणि काही इतर साथीदारांसह मिळून जसवंतला खते आणण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला शेतात घेऊन जाऊन सर्वांनी मिळून धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला. हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जसवंतचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्याचा गळा क्रूरपणे कापलेला होता. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. यानंतर नातेवाइकांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मधेपुरा सदर रुग्णालयात पाठवण्यात आला. जसवंतचा चुलत भाऊ रामानंद यादव यानेही आरोपाची पुष्टी करत सांगितले की, पुनीता बऱ्याच काळापासून अमितशी संबंधात होती.
हे लपवण्यासाठी तिने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न अमितशी लावले आणि पतीपासून अंतर राखले. ती पतीला सोडून अमित आणि मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होती.मुरलीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांनी सांगितले की, मृतकाच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (relationship)पोलिसांनी पत्नी पुनीता, तिचा भावोजी राजेश यादव आणि एका अन्य सह आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय