कर्नाटक राज्यातून आलेली ताजी आकडेवारी धक्कादायक आहे.(karnataka)2020 पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या पाच वर्षांत एकूण 13,552 लोकांचे अपहरण झाल्याचे उघड झाले आहे. या आकड्यात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे 9,789 महिला बेपत्ता झाल्या आहेत. म्हणजेच राज्यातील अपहरणाच्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण अतिशय जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2025 मध्ये सात महिन्यांतच 1,318 अपहरण यावर्षी म्हणजे 2025 च्या केवळ पहिल्या सात महिन्यांमध्येच 1,318 लोकांचे अपहरण झाले आहे. त्यात राजधानी बेंगळुरूमधूनच तब्बल 589 जण गायब झाल्याची माहिती समोर आली. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी उघड झाली असून, त्यामुळे प्रशासन आणि सरकारची चिंता अधिकच वाढली आहे.

राजधानी हादरवणारी घटना अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेली एक घटना सर्वांना हादरवून गेली होती.(karnataka)फक्त 13 वर्षांच्या एका मुलाचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. इतकेच नाही तर तुमकुरु, मांड्या, चित्रदुर्ग आणि दावणगेरे या जिल्ह्यांतही अपहरणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे चित्र आहे.

आधुनिक तंत्रज्ञान असूनही गुन्हे वाढले राज्यातील माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी या घडामोडींवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, “आज सीसीटीव्ही, मोबाईल ट्रॅकिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान असतानाही अपहरणाच्या घटना आटोक्यात येत नाहीत. लहान मुलं आणि महिलांच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवर तातडीने सुरक्षा संदर्भात विशेष बैठका घेऊन ठोस उपाययोजना करायला हव्यात.”

सरकारसमोर मोठं आव्हान आकडेवारीवरून दिसते की, गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वर्षी हजारो लोक बेपत्ता होत आहेत. त्यात महिलांचा आणि मुलांचा समावेश अधिक आहे. ही बाब केवळ प्रशासनासाठीच नव्हे तर समाजासाठीही गंभीर धोक्याची घंटा आहे. अपहरणामागे मानवी तस्करी, खंडणी, कौटुंबिक वाद किंवा इतर कोणते रॅकेट कार्यरत आहे का, (karnataka)याबाबत चौकशीची मागणी होत आहे. कर्नाटक सरकारकडून आता कोणते पाऊल उचलले जाते, पोलिस दलाला कितपत बळकट केले जाते आणि अपहरणाच्या घटनांवर कशी लगाम लावली जाते, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *