पुणे शहरात आज गुरुवारी महावितरणकडून देखभाल व दुरुस्ती (supply)कामांसाठी तब्बल सात तासांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपासून सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत शहराच्या निम्म्या भागात वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.मध्यवर्ती भागांसह उपनगरातील अनेक व्यावसायिक आणि निवासी परिसर या वीजखंडिततेच्या कक्षेत येणार आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हे काम हाती घेण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे आधीच उरकून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मध्यवर्ती भागात वीजपुरवठा बंद राहणार आहे. सदाशिव पेठ, (supply) शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, पेरूगेट, फरासखाना, जोगेश्वरी परिसर, श्रीनाथ थिएटर परिसर, कुमठेकर रोड, वाडिया हॉस्पिटल आणि टेलिफोन एक्सचेंज परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार आहे.तसेच एस पी कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, अभिनव कॉलेज, भारती विद्यापीठ भवन, जे एस पी एम कॉलेज आणि झिल कॉलेज परिसरातील नागरिकांनाही या वीजबंदचा फटका बसणार आहे.

उपनगरांसह इतर भागांनाही वीजपुरवठ्याचा फटका बसणार आहे. (supply) नवी पेठ, शनिवार पेठ, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, गांजवे चौक, रामबाग कॉलनी, सेनादत्त पोलीस चौकी परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. धायरी, नऱ्हेगाव, भूमकर चौक, अष्टविनायक औद्योगिक क्षेत्र, पारि कंपनी चौक, स्वामीनारायण मंदिर परिसर आणि आनंदनगर या उपनगरांनाही या कामाचा परिणाम होणार आहे.याशिवाय जनता वसाहत गल्ली क्रमांक पन्नास ते एकशे नऊ आणि एकशे बावीस, चुना भट्टी, एकता नगरी, संतोष हॉल चौक, वैकुंठ स्मशानभूमी आणि पुना हॉस्पिटल परिसरातही वीजपुरवठा खंडित राहील.महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून काम वेळेआधी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *