लोकप्रिय टीव्ही आणि रिॲलिटी शो अभिनेता करण कुंद्रा त्याच्या प्रेमसंबंधांमुळे अनेकदा चर्चेत असतो.(reality)अभिनेता अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे सगळ्यांच माहित आहे. तसेच त्यांचे वेगळा चाहता वर्ग देखील आहे. पण आता चाहत्यांना असे काही पुरावे सापडले आहेत ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर, करण कुंद्राचा प्रोफाइल एका डेटिंग ॲपवर पाहिला गेला होता. तो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला आहे की तो डेटिंग ॲपवर काय करत आहे.

खरंतर, बम्बल या डेटिंग ॲपवरील करण कुंद्राच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बेज रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. या प्रोफाइलमध्ये त्याचे वय ४० वर्षे लिहिले आहे.(reality) हे अकाउंट पाहून चाहते थक्क झाले आहेत. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये असताना अभिनेता या डेटिंग ॲपवर काय करत आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.करण कुंद्राशी संबंधित हा स्क्रीनशॉट रेडिटवरही व्हायरल झाला. जिथे वापरकर्त्यांनी अभिनेत्याला प्रश्न विचारले. काहींनी म्हटले की काही कलाकार रिलेशनमध्ये असूनही अशा डेटिंग ॲप्सचा वापर करतात, तर काही वापरकर्त्यांनी अकाउंटच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की हे बनावट अकाउंट असू शकते.

करण कुंद्राचे या डेटिंग अॅपशी जुने नाते आहे. त्याची एक्स प्रेयसी अनुषा दांडेकरला डेट करताना तो या अॅपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. तसेच आता करणचा फोटो आता या अॅपद्वारे व्हायरल होताना दिसत आहे.तसेच, करण कुंद्रा बिग बॉस १५ मध्ये तेजस्वीला भेटला. तेव्हापासून त्यांचे नाते सुरू झाले आणि आतापर्यंत दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. (reality)डेटिंग अॅप प्रोफाइलबाबत करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळेच लोकांची अस्वस्थता वाढली आहे. तसेच, व्हायरल होणाऱ्या अकाउंटची पुष्टी झालेली नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय