उषा नाडकर्णी यांना इस्रायलमधून का आलेला फोन?(just call) तीन वेळा इस्रायलमध्ये गेल्या आणि…, उषा नाडकर्णी यांनी केला मोठा खुलासा…, सध्या सर्वत्र उषा नाडकर्णी यांची चर्चा…

दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील त्यांची (just call) नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली होती. उषा नाडकर्णी फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उषा नाडकर्णी यांनी सांगितलेल्या त्या घटनेची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘आम्ही चाळीत राहायचो. घरात अभ्यास करण्यासाठी जागा नव्हती. आम्ही सर्व मिळून चौपाटीच्या समोर बालभवन आहे, तिकडे आम्ही अभ्यासासाठी जायचो… कळलं तिकडे सिनेमाची शुटिंग सुरु आहे. त्यामुळे पुस्तकं तिकडेच ठेवली आणि शुटिंग पाहण्यासाठी आम्ही गेलो. तिथे दिलीप कुमार आणि वैजयंती माला सर्व होते. आम्ही ब्रिज चढून गेलो तिकडे गाणं होतं दिलीप कुमार यांचं… पोलीस देखील तिकडे होते. पण त्यांनी आम्हाला सोडलं नाही. ‘
‘तेव्हा लहानपणी पाहिलं होत वैजयंती माला आणि दिलीप कुमार यांना… ‘यानंतर, त्यांनी विचारण्यात आले की, जेव्हा ती स्वतः अभिनेत्री झाल्या, तेव्हा त्यांना जाणवलं की अशा प्रकारची फॅन फॉलोइंग आणि लोकांकडून मिळणारं प्रेम हीच खरी कमाई आहे. यावेळी इस्रायलमध्ये घडलेली एक घटना देखील उषा नाडकर्णी यांनी सांगितली.
उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘इस्रायलमध्ये देखील पवित्र रिश्ता मालिका पाहत होतं. खरंच सांगते तेथील लोकांना पवित्र रिश्ता मालिका प्रचंड आवडत होती. तेथील लोकं देखील माझ्यावर प्रचंड प्रेम करत होते. मी तीन वेळा इस्रायल येथे गेली आहे. एकदा एका नाटकासाठी, त्यानंतर एका कार्यकर्मासाठी… तिसऱ्यांदा ‘लंडनची आजी’ या नाटकासाठी गेले होते. तेव्हा मला इस्रायलमधून फोन आलेला त्यांना कोंबडी पळाली गाण्यावर डान्स पाहायचा होता… त्यांनी मला आयटम सॉन्ग करायला सांगितलं होतं.’
मी इस्रायलमधील लोकांना सांगितलं, ‘मला डान्स करता येत नाही… पण तरी त्यांच्यासाठी मी घाबरुन घाबरुन डान्स केला… ते म्हणाले तुम्ही इस्रायलमध्ये या… यावर मी त्यांना म्हणाली, तिकडे येऊन मी काय करु… “मला या सगळ्याबद्दल काहीही माहिती नाही.’
उषा नाडकर्णी यांनी पुढे सांगितलं, तू तीन वेळा इस्रायलमध्ये पण एकदा देखील मला घेवून गेली नाहीस. अशी तक्रार माझ्या मुलाने केली. तेव्हा तिसऱ्यांदा मी त्याला घेवून गेली… तेव्हा तो मला म्हणाला येथील लोक तुझ्यावर किती प्रेम करतात… उषा नाडकर्णी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगत असतात.
हेही वाचा :
अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा