बॉलिवूड आणि हॉलीवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट निर्माण झाले आहेत.(history) काही चित्रपट इतके भयावह ठरले की आजही प्रेक्षक एकटे बसून पाहण्यास घाबरत नाहीत. अशाच एक गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘द ब्लेयर विच प्रोजेक्ट’ चित्रपट. हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला होता.‘द ब्लेयर विच प्रोजेक्ट’ हा चित्रपट अलौकिक व पारलौकिक घटनांवर आधारित थरारपट चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॅनियल मायरिक आणि एडुआर्डो सांचेज यांनी केले आहे.

‘द ब्लेयर विच प्रोजेक्ट’ या चित्रपटात तीन तरुण विद्यार्थी एका प्रोजेक्टसाठी जंगलात जातात. त्यानंतर ते रहस्यमयरीत्या बेपत्ता होतात. एक वर्षानंतर त्यांच्या कॅमेऱ्यातील फुटेज सापडते आणि त्यातून त्यांच्या बाबतीत घडलेल्या थरारक घटनांचा उलगडा होतो. ही कथा खूपच सुंदर असून प्रेक्षकांना एकाच जागी बसून ठेवते. (history)या चित्रपटात हीदर डोनाह्यू, मायकेल विल्यम्स आणि जोशुआ लिओनार्ड हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

या चित्रपटाची निर्मिती ही फक्त 49 लाख रुपयांच्या बजेटमध्ये झाली होती. परंतु, हा चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. (history)या चित्रपटाने अवघ्या 49 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तब्बल जगभरात तब्बल 20 अब्ज म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 2000 कोटी रुपयांची कमाई करून विक्रम प्रस्थापित केला. हॉरर सिनेमांच्या इतिहासात हा चित्रपट अत्यंत यशस्वी मानला जातो.जर तुम्हाला देखील हॉरर चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबासह पाहू शकता. ‘द ब्लेयर विच प्रोजेक्ट’ हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…

‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *