नागपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ मामा नावाच्या भोंदूबाबाने महिलेला नग्न (Naked)पूजेचा व्हिडिओ दाखवत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

मूळचा पश्चिम बंगालचा असलेला मामा मागील वीस वर्षांपासून नागपुरात स्थायिक आहे. कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेशी ओळख वाढवली आणि तिच्या घरी प्रवेश मिळवला. ‘मी काळी जादू जाणतो’ असा दावा करून त्याने महिलेला नग्न (Naked)पूजेचा व्हिडिओ दाखवला आणि अश्लील कृत्य सुरू केले. इतकेच नव्हे तर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
महिलेने धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासात असे समोर आले आहे की हा भोंदूबाबा गरीब आणि कष्टकरी लोकांना टार्गेट करत असे. तो चहाच्या टपरीवर बसून लोकांच्या समस्या ऐकायचा आणि त्यावर काळी जादू करून उपाय करतो, असा खोटा दावा करायचा.सध्या पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली असून नागपूरमध्ये या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
“केंद्र सरकारकडून मंजुरी; तालुक्याचं नवं नाव ऐतिहासिक ठरणार”
वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त…
मुंबईत पावसाची विश्रांती, पण मध्य रेल्वेची स्थिती काय?