सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे.(Railway) आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या पाच मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते वाशी हर्बल लाइन वेळेत लोकल ट्रेन येत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लोकल पकडण्यासाठी कामावरती जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

वसईच्या कामन येथील पूरग्रस्त लोकांना रियांश सामाजिक संस्थेकडून जेवण आणि बिस्किट वाटप. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवीन भोईर आणि त्यांच्या टीमने घरोघरी जावून जेवणाचे (Railway)वाटप केले. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीचे पाणी अद्यापही वसईच्या ग्रामीण सकल भागातून ओसरलेले नाही. करमाळा तालुक्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100 टक्के भरला. मांगी तलाव शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. या तलावाची एकूण पाणी क्षमता एक टीएमसी असून यावर साडेचार हजार क्षेत्र ओलिताखाली येत आहे. मांगी तलाव शंभर टक्के भरल्याने मांगी,वडगाव,पोथरे, निलज यासह उत्तरभागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण (Railway)निर्माण झाले आहे. मांगी तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव असून तो कान्होळा नदीवरील तलाव आहे. तळोघ ते जुनवणेवाडी रस्त्यावर कोसळली दरड. मातीचा ढिगारा पसरला पूर्ण रस्त्यावर. या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे झाली बंद. रस्त्याचे काम चालू असताना मातीचे उत्खनन केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा