बॉलिवूडचे महानायक(superstar), बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या 82व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. नुकताच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. चाहत्यांसोबत शेअर करताना बिग बी म्हणाले की, पूर्वी सोपी वाटणारी दैनंदिन जीवनातली अगदी लहान सहान कामं करताना आता जास्त लक्ष द्यावं लागलं आणि मेहनतही घ्यावी लागते. अमिताभ यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या डॉक्टरांनीच त्यांना सल्ला दिलाय की, पॅन्ट घालताना कुठेतरी बसा, यामुळे बॅलेन्स जाऊन पडण्याची भिती नसते. पुढे बोलताना अमिताभ बच्चन यांनी कबुल केलं की, “आता घरात ‘हँडल बार्स’ची गरज भासते. कारण आता साधा कागदाचा तुकडा उचलण्यासाठीही वाकणं पूर्वीसारखं सहज राहिलेलं नाही…”

ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन (superstar)यांनी पुढे लिहिलं की, “आता दैनंदिन दिनचर्या औषधं आणि महत्त्वाच्या कामांनुसार नियोजित केली जातात. प्राणायाम आणि हलका योगा करणं, जिममध्ये सक्रिय राहणं, संतुलन राखणं… हे सर्व आता आवश्यक झालंय. पूर्वीच्या सवयी ज्या सोप्या वाटत होत्या, त्या आता पुन्हा सुरू करणं कठीण आहे. एका दिवसाचा फरक देखील वेदना आणि वेगावर परिणाम करतो…”
“आता पॅन्ट घालणंही सोपं राहिलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, मिस्टर बच्चन, बसून पॅन्ट घाला, उभं राहून घालू नका, नाहीतर तोल जाऊन पडू शकता… हे ऐकून मी मनातल्या मनात हसलो, पण नंतर लक्षात आलं की, ते किती बरोबर होतं. टेबलावरून उडून गेलेली एक साधी चिठ्ठी उचलण्यासाठीही आता शरीर वाकताना आधार लागतो…”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.
वाढतं वय आणि त्यासोबत येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करत अमिताभ बच्चन म्हणाले की, “माझी एकच इच्छा आहे की, ही अवस्था तुमच्यापैकी कुणालाही कधीच अनुभवायला लागू नये. पण खरं सांगायचं, तर ही वेळ प्रत्येकावर येतेच. आपण या जगात जन्म घेतो, तेव्हापासूनच हळूहळू उताराची वाट चालायला लागतो. हे दुःखद आहे, पण हेच जीवनाचं कटू सत्य आहे.”
“तरुणपणात आपण सगळ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जातो, पण वय वाढलं की, आयुष्याला जणू काही स्पीडब्रेकर लागतो. उतारवयातील ही झुंज कोणीच जिंकू शकत नाही आणि शेवटी आपण सगळे हरतो. ही एक अशी हार आहे, जिचा स्वीकार करणंच योग्य ठरतं. तुमचं अस्तित्व पूर्ण झालं, आता थोडं बाजूला व्हा. हे थोडं गंभीर वाटू शकतं, पण हेच सत्य आहे.”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा हा खुलासा त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करुन त्यांना काळजी घ्यायला सांगितलं आहे. तसेच, चाहत्यांच म्हणण आहे की, अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवरुन असं दिसून येतंय की, त्यांचं वय असूनही त्यांचा उत्साह आणि आवड अजूनही कायम आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये व्यस्त आहेत. प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत ‘कलकी 2899 एडी’ या त्यांच्या अलिकडच्या चित्रपटातील अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
इंजिनियरिंग केलं; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा