ख्रिसमसच्या दिवशी झालेला रक्तपात: एका बापाने संपूर्ण कुटुंबाचा घेतला बळी,(christmas) ७ निरपराध जीवांचा अंत एका भीषण रहस्यामुळे ख्रिसमस हा आनंदाचा सण. कुटुंबासोबत साजरा करण्याचा, प्रेम आणि एकतेचा दिवस. पण १९२९ च्या ख्रिसमसच्या सकाळी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका कुटुंबासाठी हा दिवस मृत्यूचा ठरला. चार्ल्स डेव्हीस लॉसन नावाच्या शेतकऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांसोबत घेतलेला सुंदर फॅमिली फोटो काही दिवसांनी मृत्यूचा साक्षीदार ठरला.
फोटो मागचं गूढ चार्ल्सने आपल्या पत्नी फॅनी आणि सात मुलांसोबत ख्रिसमसपूर्वी स्टुडिओमध्ये एक फोटो काढला होता. त्या काळात व्यावसायिक फोटोग्राफी ही विलासिता मानली जायची. (christmas) पण त्याने खास खर्च करून हा फोटो काढला. मात्र, या फोटोशूटच्या काही दिवसांतच कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात लोळलं.२५ डिसेंबर १९२९ ची सकाळ – नरसंहाराची सुरुवात ख्रिसमसच्या सकाळी मोठी मुलगी मॅरी स्वयंपाकघरात केक बनवत होती. लहानगे मुलं सणाचा आनंद घेत होती. पण चार्ल्सच्या मनात आधीपासून एक भयंकर निर्णय पक्का झाला होता.
प्रथम त्याने घराबाहेर जाणाऱ्या दोन मुलींना, कॅरी आणि मॅबेल यांना बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार केले. त्यांचे मृतदेह बागेत ओढून ठेवले. घरी परतल्यावर त्याने पत्नी फॅनीवर गोळी झाडली. मग मॅरीला संपवलं, (christmas) कारण तिच्याशी संबंधित एक काळं रहस्य उघड होणार होतं. नंतर लहान मुले जेम्स , रेमंड आणि केवळ चार महिन्यांची मॅरी लू हिलाही त्याने निर्दयतेने मारलं. मृतदेहांच्या हातांना जोडून ठेवले गेले, डोक्याखाली दगड ठेवले होते – जणू काही एखाद्या विधीप्रमाणे.

एकमेव वाचलेला मुलगा या नरसंहारातून आर्थर नावाचा मोठा मुलगा वाचला. चार्ल्सने त्याला आदल्या रात्री काही कामासाठी घराबाहेर पाठवले होते. आर्थर परतल्यावर त्याने आई-वडील आणि भावंडांचे मृतदेह पाहिले आणि पोलिसांना खबर दिली.खुनी बापाचा शेवट पोलिस चौकशीदरम्यान जवळच्या जंगलातून गोळीबाराचे आवाज आले. चार्ल्सने आत्महत्या केली होती. झाडाभोवती त्याचे पावलांचे ठसे दिसत होते, म्हणजे तो बराच वेळ विचार करत हिंडत होता. मृत्यूपूर्वी त्याने काही पत्रेही लिहून ठेवली होती, पण ती कधीच पूर्णपणे उलगडली नाहीत.
खरे रहस्य ६० वर्षांनंतर समोर आले १९९० मध्ये या हत्याकांडामागचे भीषण कारण बाहेर आले. स्टेला बोल्स नावाच्या नातलग महिलेनं सांगितलं की चार्ल्स स्वतःच्या मोठ्या मुली मॅरीचे लैंगिक शोषण करत होता. मॅरी गर्भवती होती आणि हे मूल तिच्या वडिलांचे असल्याचे तिने आपल्या मैत्रिणीला कबूल केले होते. पत्नी फॅनीलाही ही गोष्ट समजली होती. त्यामुळे घरात तणाव वाढला. आपली लाज आणि गुन्हा बाहेर येऊ नये म्हणून चार्ल्सने संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला.

एक काळं गूढ आणि धक्का देणारी शोकांतिका आजही हा नरसंहार अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत भीषण कौटुंबिक हत्याकांड म्हणून आठवला जातो. एका बापाने स्वतःच्या अपराधाचं रहस्य दडवण्यासाठी पत्नी आणि सात मुलांचे जीव घेतले, हा प्रकार ऐकून प्रत्येकाचा ह्रदय पिळवटून जातो.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय