मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात 2006 मध्ये एक असा गुन्हेगार(citizens) समोर आला ज्याने पोलिसांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांची झोप उडवली. हा सीरियल किलर त्याच्या हत्येच्या अनोख्या शैलीमुळे “बिअर मॅन” म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचा पॅटर्न एकच होता – प्रथम आपल्या बळीला बिअर पाजायचा, नंतर त्याची हत्या करायची आणि मृतदेहाजवळ एक बिअरची बाटली ठेवायची.

पहिली हत्या – टॅक्सी ड्रायव्हर विजय ऑक्टोबर 2006. मुंबईतील मरीन लाइन्स स्टेशनच्या फुटओव्हर ब्रिजवर पोलिसांना एका टॅक्सी ड्रायव्हरचा मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ पडलेली (citizens) बिअरची बाटली हेच एकमेव सूत्र हाताला लागलं. या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली पण गुन्हेगाराचा काहीच मागमूस लागला नाही.

एका पाठोपाठ एक हत्या डिसेंबरमध्ये चर्चगेट स्टेशनजवळ पुन्हा एक मृतदेह सापडला. आणि त्याच्याजवळही बिअरची बाटली. जानेवारी 2007 पर्यंत अशा एकूण 7 हत्या झाल्या. सर्व मृतदेह मरीन लाइन्स ते चर्चगेट या परिसरात सापडत होते आणि प्रत्येकवेळी तोच खूनी ठसा — रिकामी बिअरची बाटली.

या घटनांमुळे मुंबईत भीतीचं सावट पसरलं. सामान्य प्रवासी लोकलमध्ये प्रवास करताना घाबरू लागले. पोलिसांच्या नजरेत हा एक सीरियल किलर असल्याचं स्पष्ट झालं होतं. पोलिसांची तपासमोहीम या(citizens) प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) नेमलं. मात्र गुन्हेगार फार चलाख होता. पुराव्याच्या नावावर फक्त बाटल्या सापडत होत्या. शेवटी 22 जानेवारी 2007 रोजी धोबी तलाव परिसरातून रविंद्र कांतरोल नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या अंगावर रक्त लागलेले कपडे आणि एक खंजर आढळला.

थरकाप उडवणारी कबुली फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नार्को टेस्टमध्ये रविंद्रने धक्कादायक खुलासा केला. त्याने तब्बल 15 हत्यांची कबुली दिली. त्याने सांगितलं की तो व्यसनाधीन आहे. नशेत असताना तो आपल्या शिकाराला बिअर पाजून निर्दयपणे मारून टाकायचा. जेव्हा त्याला “हे का करत होतास?” विचारलं, तेव्हा त्याचं उत्तर फक्त इतकंच होतं – “मला रक्त आवडतं.”

शिक्षा आणि शेवट नंतर तीन हत्यांचे प्रकरण स्थानिक न्यायालयात चाललं. जानेवारी 2009 मध्ये न्यायालयाने रविंद्र कांतरोलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. का लक्षात राहतो “बिअर मॅन”? प्रत्येक हत्येनंतर बिअरची बाटली ठेवण्याची अनोखी पद्धत. गुन्ह्यांमागचं कारण म्हणजे “रक्ताची आवड” — जे थरकाप उडवणारं आहे. मुंबईसारख्या सुरक्षित वाटणाऱ्या शहराला हादरवून सोडलेला सीरियल किलर.

हेही वाचा :

2400 कोटींचं कर्ज… अदानींनी परदेशातून का आणला एवढा पैसा
गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर..
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *