भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी (Adani)उद्योग समूहाने जवळपास 275 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 2400 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. विशेष म्हणजे हे कर्ज परकीय चलनामध्ये घेण्यात आलं आहे. अदानी समूह अजूनही कर्ज घेऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय.

अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडने 150 मिलियन डॉलरचं कर्ज घेतलं आहे. वेगवेगळ्या बँकांकडून हे कर्ज घेण्यात आलं आहे. अदानी समुहाला कर्ज देणाऱ्यांमध्ये मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप, डीबीएस बँक लिमिटेड, बार्कलेज पीएलसी तसेच फर्स्ट अबू धाबी बँक अशा चार महत्त्वाच्या वित्तीय संस्थांचा समावेश आहे.
अदानी(Adani) समूहाच्या मालकीच्या केवळ विमानतळांसंदर्भातील कंपनीने नाही तर बंदरांसंदर्भातील कंपनीनेही मोठं कर्ज घेतलं आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने 125 मिलियन अमेरिकी डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे. हे कर्ज मात्र मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुपसोबतच्या द्विपक्षीय करारानुसार घेण्यात आलं आहे.
विमानतळांसंदर्भातील कंपन्यांसाठी घेतलेल्या कर्जावर सिक्युअर्ड ओव्हरनाईट फायनान्सिंग रेट (SOFR) पेक्षा सुमारे 300 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज आकारले जाणार आहे. तर बंदरांसाठी घेतलेल्या कर्जावर ‘एसओएफआर’पेक्षा 215 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज आकारले जाईल, अशी माहिती समोर येत आहे. मोठ्या स्वरुपातील कर्जांसाठी ‘एसओएफआर हा एक बेंचमार्क व्याजदर आहे. एकूण 2400 कोटींची ही दोन्ही कर्जे चार वर्षांसाठी घेण्यात आलेली आहेत. यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर डॉलर बॉन्ड्स परत खरेदी करण्यासाठी आणि भांडवली खर्चासाठी केला जाईल.
गुंतवणूकदारांचा अदानी समूहावरील विश्वास वाढत आहे. यामुळेच या बँका अदानी समूहाला कर्ज देण्यास तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी विविध मार्गांनी निधी उभारण्याचा अदानी समूहाचा प्रयत्न आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये अदानी समूहाने 10 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक कर्ज घेतले आहे.

गेल्या सहा महिन्यांत अदानी समूहाने $10 अब्जांहून अधिक नवीन कर्ज सुविधा घेतल्या, जे त्यांच्या एकूण कर्जाच्या सुमारे एक तृतीयांश आहे.2023 मध्ये समूहाचे एकूण कर्ज ₹2.21 लाख कोटी होते, तर निव्वळ कर्ज ₹1.89 लाख कोटी होते.2025 मध्ये परकीय बाँड्सच्या परतफेडीची कोणतीही अंतिम मुदत नाही, परंतु 2026 मध्ये $1 अब्ज परतफेडीची अपेक्षा आहे.
विस्तार आणि विकास: कर्जातून मिळालेला निधी विमानतळ आणि बंदर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी वापरला जाईल, ज्यामुळे समूहाची बाजारपेठेतील हिस्सा वाढेल.आर्थिक स्थैर्य: बाँड्स परत खरेदी आणि कर्ज पुनर्रचना यामुळे समूहाची आर्थिक स्थिरता वाढेल.जागतिक विश्वासार्हता: जागतिक बँकांचा सहभाग आणि S&P चे सुधारित रेटिंग यामुळे अदानी समूहाची जागतिक पातळीवरील विश्वासार्हता वाढेल, परंतु यूएसमधील कायदेशीर जोखीम आणि व्याजदरातील वाढ यांचा सामना करावा लागेल.
हेही वाचा :
‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट
हत्येनंतर मित्रांचं संभाषण व्हायरल; “भाई, मारायचं नव्हतं” वाक्याने खळबळ
सप्टेंबर ठरणार टर्निंग पॉईंट? अंजली दमानियांचं शिंदेंबाबतचं वादग्रस्त भाकीत