डोनाल्ड ट्रम्प हे लहरी असल्याचा फटका जगाला बसला आहे. त्यातच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहे. टॅरिफ वॉर, नोबेल याभोवतीच त्यांचं राजकारण केंद्रीत झालं आहे. आता त्यांना स्वर्गारोहणाची स्वप्नं पडू लागली आहेत.तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला वेठीस धरण्याचा जोरकस प्रयत्न सुरू केला आहे. जगात शांतता आणण्याचे नाटक करत जगावर अमेरिकेची दादागिरी त्यांना थोपवायची आहे. त्यातच आता ट्रम्प यांना स्वर्गारोहणाची(heaven) स्वप्नं पडू लागली आहे.

पण त्यासाठी अर्थातच त्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते पुण्य पदरात पडलं की, देव आपल्यासाठी स्वर्गाची दारं सताड उघडी करून ठेवेल असं त्यांना वाटतंय. अर्थात त्यांना कोणतं पुण्य पदरात पाडून घ्यायचं आहे हे तर उघडच आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाविषयी हे आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी गंमतीत एक वक्तव्य केलं आणि ते चांगलंच व्हायरल झालं. ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यात जर शांतता करार झाला तर त्यांची स्वर्गात जाण्याची शक्यता बळावेल. मंगळवारी एका अमेरिकन वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली.
त्यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, मी प्रयत्न करतोय की, मी स्वर्गात(heaven) जावं. मी असं ऐकलं की, माझी तब्येत चांगली नाही. मी तर सर्वात खाली आहे. पण जर हे काम करू शकलो(रशिया-युक्रेन शांतता करार) तर कदाचित मला स्वर्गात जाण्याचा मार्ग मिळेल.आपण जगातील 6 युद्धे थांबवली. या देशांमध्ये शांतता आणली. आपण आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवू इच्छित आहोत. त्यांच्यात शांतता करार व्हावा अशी आपली इच्छा आहे, असे ट्रम्प म्हणाले.जर युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध थांबले तर ते जगासाठीच नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनातील एक ऐतिहासिक पाऊल ठरेल असे ट्रम्प यांना वाटते.

इतकेच नाही तर नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावल्याचे मानल्या जात आहे. भारताने त्यांना युद्ध थांबवल्याचे क्रेडिट न दिल्यानेच ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांकडे नोबेल पुरस्कार मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी नॉर्वेने पाठिंबा देण्याची सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवली. तर स्वीडन या नोबेल पुरस्कार देणाऱ्या देशावर काय दबाव टाकला हे काही समोर आले नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयुष्य वादळी ठरले आहे. त्यांनी तीनदा लग्न केले आहे. त्यांना दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागला आहे. तर एका गुन्ह्यात त्यांना दोषी पण ठरवण्यात आले होते. ट्रम्प यांच्या हडेलहप्पी धोरणामुळे अमेरिकेतच नाही तर जगभरात ते ट्रोल होत आहेत. त्यांच्याविरोधात संताप आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर ठरणार टर्निंग पॉईंट? अंजली दमानियांचं शिंदेंबाबतचं वादग्रस्त भाकीत
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर…..
मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव….