छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या नवरा-बायकोंनी जमिन हडपण्यासाठी एका महिलेवर क्रूर हल्ला केला. आरोपींनी महिला झोपलेली असताना गळा (Throat)दाबून मारण्याचा प्रयत्न केला, आणि महिलेचा मृत्यू झाला असे समजून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोलगेट टाकले.

पोलीसांनी नंतर आरोपी लखमा कुंजाम आणि त्याची पत्नी कुमे कुंजाम यांना अटक केली. किरंदुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री महिला घरात झोपली होती. त्या दरम्यान, आरोपी दाम्पत्याने तिला टॉवेलने गळा(Throat) दाबून मारण्याचा प्रयत्न केला. महिलेचा जीव वाचल्याचे समजल्यावर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्टवर कोलगेट टाकला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळपर्यंत महिला अर्धनग्न अवस्थेत घरात पडली होती, त्याचा श्वास चालू असल्याचे पाहून आरोपींनी स्वतः गावात आरडाओरडा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची मदत केली. चौकशीदरम्यान, लखमा आणि त्याची पत्नी वारंवार आपले जबाब बदलत होते, ज्यामुळे त्यांच्यावर संशय निर्माण झाला. अखेरीस, दोघांनी गुन्हा कबुल केला आणि जमीन हडपण्यासाठी हा कट रचल्याचे मान्य केले.हा प्रकार गावकरी आणि परिसरातील लोकांसाठी धक्कादायक ठरला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

शालेय पोषण आहाराची आता तपासणी होणार; शिक्षण विभागाची धडक मोहीम

ब्रेकअपनंतरचा थरार! 15,500 फूटांवरून स्कायडायव्हरची उडी ठरली जीवघेणी

हरणाची मान तोंडात पकडून गरुडाने घेतली अवकाशात झेप Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *