राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीला(crime) आळा घालण्याचा प्रयत्न सर्व स्तरांकडून करण्यात येत आहे. मात्र तरी देखील खून, बलात्कार, हाणामारी, दरोडा अश्या अनेक घटना दैनंदिन घडत आहे. आता देशाची राजधानी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आला आहे. पोलिसांनी या पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे हे अत्याचार करणारे पाचही मुले हे अल्पवयीन आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. या ब्लॅकमेलिंगला बळी पडून पाच अल्पवयीन मुलांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. या घटनेने काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा(crime) नोंदवून आरोपीने ताब्यात घेतले आहे.
ही पाच मुले कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे.
हेही वाचा :
‘या’ जिल्ह्यातील 1 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं
ट्रॅक्टर ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स, जीपीएस बसवणार? सतेज पाटलांचा सरकारला सज्जड इशारा
शालेय प्रोजेक्टसाठी प्रकाशजी खारगे यांची प्रधान सचिव विकासजी खारगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा
शालेय प्रोजेक्टसाठी प्रकाशजी खारगे यांची प्रधान सचिव विकासजी खारगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा