येत्या 29 ऑगस्टपासून प्रो कबड्डी लीगचा बारावा सीझन (jersey)सुरु होतोय. याच पार्श्वभूमीवर यू मुम्बा संघानं आगामी सीझनसाठी नव्या जर्सीचं अनावरण केलं. यू मुंबाचा कर्णधार सुनील कुमार आणि संघमालक रॉनी स्क्रूवाला यांच्यासह सीईओ सुहेल चंडोक, अनिल चपराना यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये जर्सी लॉन्चिंगचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कर्णधार सुनील कुमारनं दहा वर्षांनी संघाला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दहा वर्षांपूर्वी एकमेव जेतेपद
2015 साली अनुप कुमारच्या नेतृत्वात यू मुंबानं एकमेव विजेतेपद पटकावलं होतं. मात्र त्यानंतर गेल्या अनेक सीझनमध्ये यू मुंबा संघाला विजेतेपदानं हुलकावणी दिली. मात्र यावेळी यू मुंबाचा (jersey)संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. दहा वर्षांपूर्वीच्या त्या जेतेपदाची पुनरावृत्ती करणार असल्याचं कर्णधार सुनील कुमारनं म्हटलंय. 2015 साली प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये मुंबईनं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.
सुनील कुमारवर भिस्त
यू मुंबाचा कर्णधार सुनील कुमारनं गेल्या काही वर्षांपासून यू मुंबाच्या कामगिरीचा खालावलेला आलेख उंचावण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी यू मुंबा संघाचं कर्णधारपद सुनील कुमारकडे आलं. त्यानंतर त्यानं उत्तम प्रकारे संघाची बांधणी केली. प्रो कबड्डीच्या अकराव्या सीझनमध्ये त्याचा परिणामही दिसून आला. संघाला प्ले ऑफ पर्यंत नेलं. मात्र यावर्षी आणखी चांगली कामगिरी करुन यू मुंबाला जेतेपदापर्यंत पोहोचवण्याची ताकद सुनील कुमारच्या संघात असल्याचं दिसतंय.
29 ऑगस्टपासून प्रो कबड्डीचा थरार
येत्या 29 ऑगस्टपासून प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या सीझनचं बिगुल वाजणार आहे. विशाखापट्टणम, चेन्नई, जयपूर आणि दिल्लीमध्ये हे सामने पार पडतील. साखळी फेरीत एकूण १०८ सामने होणार आहेत. त्यात प्रत्येक संघ १८ सामने खेळणार आहे. तर यू मुंबाचा पहिला सामना हा ३० ऑगस्टला गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा :
जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ?
10 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह कोसळणार पाऊस….
पॅसेंजर ट्रेन की मालगाडी, कोणत्या लोको पायलटचा पगार जास्त?