बिहारमधील पटनामध्ये शनिवारी सकाळी ऑटो आणि ट्रकचा भयंकर अपघात जाला आहे. या अपघातामध्ये(accident) आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये सात महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑटोमधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. एका ट्रकने ऑटोला जोरात धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा चुराडा झाला आहे.

अपघातानंतर (accident)महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी सुरळीत केली. त्याशिवाय जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला. पोलिसांनी आठ मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पटनामधील शाहजहांपूर येथे ऑटो आणि ट्रकचा हा भयंकर अपघात झाला. ग्रामीण एसपीने अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, या भयंकर अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. ऑटोमधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी नालंदा फतुहाकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

स्थानिकांनी अपघाताबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या अपघात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च होणार पुनरागमन

बडीशेप खाणे अधिक फायदेशीर की भिजत ठेवलेल्या बडीशेपची पाणी

कोल्हापुरात वर्चस्ववादाचा उद्रेक; दोन गट आमनेसामने, दगडफेक-जाळपोळ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *