मुलींना येणारी मासिक पाळी ही वेदनादायक असते. (experiencing)या वेदनेकडे ती किरकोळ म्हणून अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र या वेदनेने एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सदर घटना ही कर्नाटकातील तुमकुर येथे घडली आहे. तरुणीला मासिक पाळीत पोटात तीव्र वेदना झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मारिया बदलेलं नाव नोकरीच्या शोधात दोन महिने तिच्या मामाच्या घरी आली होती. नोकरी न मिळाल्याने ती तिथेच राहिली. तिला काय होत आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. मारिया बऱ्याच काळापासून पोटदुखी आणि मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त होती. तिला वेदना इतक्या तीव्र व्हायच्या की ती दैनंदिन कामे करू शकत नव्हती.

समाजात महिलांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू असलेल्या (experiencing) मासिक पाळीवर जास्त चर्चा केली जात नाही. अनेकदा मुली या त्रासाबद्दल इतरांना सांगताना घाबरतात. परिणामी, मारिया तिच्या वेदना कोणालाही सांगू शकली नाही. तिला उघडपणे व्यक्तही करता येत नसलेल्या वेदनांमुळे ती खूप दुःखी होती. दरम्यान या मासिक पाळीच्या वेदनांमुळे तिचा मृत्यू झाला.
ज्या दिवशी मारियाचा मृत्यू झाला त्या दिवशी घरी कोणीही नव्हते. (experiencing) मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेने मारियाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . वेळोवेळी छोट्या छोट्या आजारांवर उपाय करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
पगाराचा मार्ग मोकळा! अखेर अधिकारी करणार
यूपीआयचा वेगाने जागतिक विस्तार! लवकरच ‘या’
मतदानाचा फोटो शेअर केला तर कायदेशीर