कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकात कमानीजवळ काल रात्री (22 ऑगस्ट) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची (stone)घटना घडली. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून काल दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. या चौकात वर्चस्व कुणाचं यावरुन देखील अनेक वर्ष तरुणांमध्ये वाद आहे. काल सायंकाळी हा वाद उफाळून आला.

ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतपलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमाबावर नियंत्रण आणलं.
दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावला पांगवलं. तर काहींना ताब्यात घेतलं आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, वादाला सुरुवात झाल्यानंतरल मोजका पोलिस बंदोबस्त तैनात होता. यावेळी दोन्ही बाजूकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावासमोर पोलिसांची हतबलता झाली. यानंतर अतिरिक कुमक मागवण्यात आली. स्वत: पोलिस अधीक्षक योगेश गुप्ताही दाखल झाले. कोल्हापूर सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत काही पोलिस सुद्धा जखमी झाले आहेत. दगडफेकीत अनेक वाहनांना सुद्धा लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात काचा आणि दगडांचा खच पडला होता. वीज पुरवठा खंडित असल्याने सुद्धा कोण कोणावर दगडफेक (stone)करत आहे याबाबत समजून येत नव्हते.
हेही वाचा :
जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ?
10 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह कोसळणार पाऊस….
पॅसेंजर ट्रेन की मालगाडी, कोणत्या लोको पायलटचा पगार जास्त?