डोनाल्ड ट्रम्प सरकारचा पाकिस्तानवर कडक निर्णय; (president)विद्यार्थ्यांमध्ये वाढली चिंता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानविरुद्ध आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या ट्रम्प प्रशासनाने आता कडक नियम लागू केले असून, याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेत शिकणाऱ्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर लक्ष नवीन नियमांनुसार पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा नजर ठेवणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने अमेरिका, अमेरिकन सरकार किंवा संस्थांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्यांचा व्हिसा रद्द होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे.

छोट्या चुकीलाही मोठी शिक्षा फक्त सोशल मीडियाच नाही, तर वाहतूक नियम मोडल्यास, कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने केल्यास किंवा गोंधळ घातल्यासही थेट यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी कारवाई करणार आहे (president)न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, अगदी किरकोळ चुकाही व्हिसा रद्द होण्याचे कारण ठरू शकतात.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया शिकागोला जाण्याची तयारी करणाऱ्या युनूस खानने सांगितले, “आता एक छोटीशी चूकही व्हिसा धोक्यात आणू शकते. त्यामुळे प्रवास पुढे ढकलावा लागला.” तर समिना अली म्हणाली, “मी आणि माझ्या मैत्रिणी पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात सहभागी झालो होतो, त्यामुळे आमचा व्हिसा रद्द होईल की काय अशी भीती वाटतेय.”

दूतावासाचा सल्ला वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने विद्यार्थ्यांना संयम राखण्याचं आणि राजकीय विषयांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी,(president) असाही सल्ला दिला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?