गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यंदा सुट्ट्यांचा हिशोब(cleared) नेमका किती दिवसांचा राहणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी येत आहे तर विसर्जन 6 सप्टेंबरला होणार आहे. याच दरम्यान गौराईचे आगमन व पूजा, तसेच 5 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद असल्याने शाळांच्या कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांची गणिते बदलली आहेत. मुंबई, पुणे आणि कोकणपट्टीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. नोकरी-व्यवसायासाठी शहरात राहणारे कोकणवासीय आपल्या गावी जाण्याने शाळांना परंपरेने या काळात अधिक सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांचे नियोजन आधीच करून प्रवास, पूजा आणि कौटुंबिक कार्यक्रमांची आखणी करणे सोयीचे ठरणार आहे.

मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांना परंपरेने 5 दिवसांच्या सुट्ट्या असत, मात्र यंदा गौराई कार्यक्रम 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आल्याने विद्यार्थ्यांना एकूण 7 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. (cleared) 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या या सुट्ट्या गौराई विसर्जनापर्यंत चालणार असून कुटुंबासोबत उत्सव साजरा करण्यास अधिक वेळ मिळणार आहे.दुसरीकडे, मुंबईतल्या काही सीबीएसई व आयसीएसई बोर्ड शाळांमध्ये नेहमीप्रमाणे 5 दिवसांच्या सुट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुख्य उत्सवाच्या दिवसांना प्राधान्य देऊन शैक्षणिक कामकाज शक्य तितके सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबई-कोकण वगळता राज्यातील इतर भागांत 27 ऑगस्ट गणेश चतुर्थी, 1 सप्टेंबर गौराई पूजा, 5 सप्टेंबर ईद-ए-मिलाद आणि 6 सप्टेंबर गणेश विसर्जन अशी किमान 4 सुट्टीचे दिवस अपेक्षित आहेत. (cleared) ज्या शाळांना शनिवार-रविवार सुट्टी असते, त्या ठिकाणी या चार सुट्ट्यांमध्ये दोन शनिवार आणि दोन रविवार धरल्यास विद्यार्थ्यांना उत्सवकाळात एकूण सुमारे 8 दिवस विश्रांती लाभू शकते. काही वेळापत्रकांनुसार 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या सात दिवसांपैकी शाळांना सलग सुट्ट्या लागू शकतात आणि त्यानंतर 5 सप्टेंबरची ईद-ए-मिलाद, 6 सप्टेंबरचे विसर्जन व 7 सप्टेंबरचा रविवार धरल्यास एकूण 9 दिवस सुट्या मिळण्याची शक्यता आहे. ज्या शाळांमध्ये मुख्यतः 5 दिवसांच्या सुट्ट्या असतात, त्या ठिकाणीही ईद-ए-मिलाद, विसर्जन आणि रविवार मिळून साधारण 8 दिवस विश्रांतीचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळेल.

हेही वाचा :

सरकारी वकिलाच्या आत्महत्येत ई-मेलचा धक्कादायक खुलासा….

लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू

शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *