राज्यामध्ये मागील चार महिन्यांत 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी (farmer)आत्महत्या केली आहे. राज्यामध्ये जोरदार पावसामुळे लाखो एकरवरील शेतमालाचं नुकसान झालं आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिलाय. शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी, असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, असं म्हणत पाशा पटेल यांनी हात झटकले आहेत. पाशा पटेल यांच्या या विधानमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

“365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना(farmer) संकटाला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भूक आता भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी,” असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर, “अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही,” असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले.
धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे. नेवासे तालुक्यातील बाबासाहेब सरोदे हा सामान्य शेतकरी ‘‘सरकारने साथ दिली नाही,’’ असे म्हणत हताशपणे मृत्यूला कवटाळची घटना ताजी असतानाच भाजपाच्या नेत्याने असं असंवेदनशील विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मागील चार महिन्यांत राज्यात 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच, जोरदार पावसामुळे लाखो एकर शेतमालाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.पाशा पटेल हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत.शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असताना आणि बाबासाहेब सरोदे यांच्यासारख्या शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असताना, पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची सवय लावण्याचा सल्ला दिला आणि सरकार मदत देऊ शकत नाही असे सांगितले. यामुळे त्यांचे विधान असंवेदनशील मानले जात आहे.
हेही वाचा :
गंगा स्नानाला जाताना काळाचा घाला, ट्रकने ऑटोला चिरडले, ८ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च होणार पुनरागमन
बडीशेप खाणे अधिक फायदेशीर की भिजत ठेवलेल्या बडीशेपची पाणी