विधानसभा निवडणुकीच्या (elections) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राजकारणासोबतच समाजातही मोठ्या चर्चेचा विषय ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यावर मिळू लागले. या आर्थिक मदतीचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आला आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

मात्र, योजना सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे (elections) बोलले जाऊ लागले. इतर विभागांचा निधी वळवून ही योजना राबवली जात असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. दरम्यान, केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याची तक्रार केल्याने महिला व बालकल्याण विभागाने थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले. नियम आणि अटी डावलून अर्ज करण्यात आल्याचे प्रकार समोर येत असून, त्याची सखोल तपासणी सुरू आहे.

हप्ता न मिळाल्यामुळे काही ठिकाणी महिलांचा असंतोष रस्त्यावर (elections) उतरल्याचे चित्रही पाहायला मिळाले. अशा पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झाला असून, पात्र महिलांच्या खात्यावर थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना आधी दोन महिन्यांचा हप्ता मिळालेला असला तरी, ज्यांचा पूर्ण तीन महिन्यांचा हप्ता प्रलंबित आहे, त्यांना तो एकरकमी दिला जाणार आहे.

दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योजनेबाबत महत्त्वाचे (elections) संकेत दिले आहेत. तिजोरीचे खाते पुन्हा आपल्या विभागाकडे आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात लाडक्या बहिणींना दरमहा अधिक आर्थिक मदत मिळण्याची शक्यता बळावली असून, या योजनेकडे पुन्हा एकदा आशेने पाहिले जात आहे.

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *