लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र(Maharashtra) पहिल्या क्रमांकावर आहे. 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या असून, 25 लाख होणार आहेत. 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे. राज्यातील महिलांनी पाठवलेल्या हजारो रख्या मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्ष आमदार चित्रा वाघ, मंत्री आशिष शेलार व इतर नेते यावेळी उपस्थित आहेत.
“नरेंद्र मोदींनी लखपती दीदीचा कार्यक्रम जाहीर केली तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता. एकदा लाख रुपये किंवा तशी स्थिती झाली तर लखपती दीदी म्हणायचं का? तर असं नाही. जी महिला स्वत:च्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाखांपेक्षा जास्त कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल.

त्यासाठी वेगवेगल्या योजना सुरु केल्या. लखपती दीदीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र(Maharashtra) पहिल्या क्रमांकावर आहे. 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत आणि 25 लाख होणार आहे. 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा :
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?
नागरिकांनो काळजी घ्या! पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज