महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण(Ladki Bahin) योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण (Ladki Bahin)योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत. दरम्यान, या महिन्यातदेखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
हेही वाचा :
सरकारी वकिलाच्या आत्महत्येत ई-मेलचा धक्कादायक खुलासा….
लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू
शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला