राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाला (hoisted) असून भाजप आणि महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. मुंबई , पुणे , पिंपरी-चिंचवड नाशिक , छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये भाजप आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. 29 पैकी तब्बल 25 महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येत आहे.

मुंबई महापालिकेतही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे.”(hoisted) त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत असल्याचं मानलं जात आहे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपने या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दृष्टीकोनाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या महापालिकांमधील निकाल पाहता नागरिकांना प्रामाणिक आणि विकासाभिमुख राजकारण अपेक्षित असल्याचं स्पष्ट झाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं (hoisted) असताना भाजप-शिंदे शिवसेना महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र आहे. सध्या उपलब्ध कलानुसार महायुती 120 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून, ठाकरे गट आणि मनसे मिळून त्यापेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबईतही भाजप नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता येणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा :