भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली या मालिके आधी भारताचे दोन्ही स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट(cricket news) मधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर या दोघांनीही फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार असे सांगितले होते. 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत पण हे जास्त वेळ भारतीय संघासाठी खेळणार नाहीत अशी अटकळ बांधली जात आहे.

2023 मध्ये भारतामध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आता 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या 2027 च्या विश्वचषकआधी भारतीय निवडकर्ते मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत. पण आशिया कपपूर्वी भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली(cricket news) आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
कोहली आणि रोहितच्या एकदिवसीय भविष्याबद्दलच्या अटकळींवर बीसीसीआयने आता आपले मौन सोडले आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की बोर्ड त्यांच्या भविष्याबद्दल कोणताही निर्णय घेण्याची घाई करत नाही आणि सध्या त्यांचे लक्ष आगामी आशिया कप आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीवर आहे.
इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतर, आशिया कप सुरू होईपर्यंत भारत कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणार नाही. या काळात, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल चर्चा तीव्र झाल्या आहेत. वृतांच्या माहितीनुसार असे सूचित केले होते की दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 2025) त्यांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीला निरोप देऊ शकतात.
तसेच, जर त्यांना २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळायचे असेल तर त्यांना देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घेण्यास सांगण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटशिवाय निवडीची शक्यता कमी मानली जाते. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अनुभवी सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, बीसीसीआयमध्ये ‘फेअरवेल मॅच’ची अशी कोणतीही घाई किंवा चर्चा झालेली नाही. तसेच कोणत्याही खेळाडूवर निवृत्तीसाठी दबाव आणला जात नाही. बोर्ड घाईघाईत संवेदनशील निर्णय घेत नाही आणि मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत जनतेच्या भावना आणि खेळाडूंच्या इच्छेला महत्त्व देते.
सूत्रानुसार, “कोहली आणि रोहित हे दोघेही खेळाडू आधीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत आणि सध्या ते फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय आहेत. जर त्यांच्या मनात काही योजना असतील तर ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्कीच सांगतील जसे त्यांनी इंग्लंड कसोटी दौऱ्यापूर्वी सांगितले होते. दुसरीकडे, जर आपण भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, पुढची मोठी स्पर्धा फेब्रुवारीमध्ये होणारा टी-२० विश्वचषक आहे आणि आपल्याला आता त्याची तयारी करावी लागेल, ज्यामध्ये आमचे लक्ष सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप टी-२० स्पर्धेवर आहे, ज्यामध्ये आम्ही एक चांगला संघ पाठवण्याचा प्रयत्न करू.”
हेही वाचा :
‘झुकेगा नही साला’ म्हणणारा अल्लू अर्जुन शेवटी मुंबईत झुकला, व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव