साऊथ इंडस्ट्रीमधील(Entertainment news)सुपरस्टार आणि ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या हटके स्टाइल आणि दमदार अभिनयाने चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. पण यावेळी तो आपल्या लूक किंवा सिनेमामुळे नाही तर एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावरचा त्याचा आणि CISF जवानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन विमानतळावर सुरक्षा तपासणी करताना दिसत आहे. यावेळी त्याने पांढरा टी-शर्ट, काळी पॅन्ट, डोळ्याला गॉगल आणि चेहऱ्यावर मास्क लावले आहे. त्याचा हा साधा लूक आणि मास्कने झाकलेला चेहरा पाहून तिथे असलेल्या CISF जवानाने त्याला गॉगल आणि मास्क काढण्याची विनंती केली.
सुरुवातीला अल्लू अर्जुनने(Entertainment news) मास्क काढण्यास नकार दिला, मात्र नियमांनुसार ओळख पटवण्यासाठी CISF जवानाने त्याला गॉगल आणि मास्क दोन्ही काढावे लागले. त्याने आपला आयडी प्रूफही दाखवला आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याला आत प्रवेश देण्यात आला.
अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेळ्या प्रतिक्रिया व्हिडीओच्या कमेंटमध्ये दिल्या आहेत. यामध्ये काही नेटकऱ्यांनी CISF जवानांच्या कामाचे कौतुक करत सेलिब्रिटी असो वा सामान्य नागरिक, नियम सर्वांसाठी सारखेच असे म्हटलं आहे. तर काहींनी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ डायलॉगची आठवण काढत ‘झुकेगा नहीं साला’ असे लिहिले. तर दुसऱ्याने झुकेगा नहीं साला पण इथे झुकावे लागले असं म्हटलं आहे.
मुंबई विमानतळावर अल्लू अर्जुनसोबत घडलेली ही घटना काही सेकंदांची असली तरी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ती मोठ्या प्रमाणात शेअर देखील केली जात आहे. चाहत्यांसोबतच सामान्य प्रेक्षकांच्याही नजरा या व्हिडीओवर खिळल्या आहेत. काहींनी हा प्रसंग सेलिब्रिटींना मिळणाऱ्या विशेष वागणुकीच्या चर्चेत जोडला आहे तर काहींनी तो केवळ सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग असल्याचं म्हटलं.
हेही वाचा :
‘या’ जिल्ह्यातील 1 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं
ट्रॅक्टर ट्रॉलींवर ब्लॅक बॉक्स, जीपीएस बसवणार? सतेज पाटलांचा सरकारला सज्जड इशारा
शालेय प्रोजेक्टसाठी प्रकाशजी खारगे यांची प्रधान सचिव विकासजी खारगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा