पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉयफ्रेंडला मेसेज का केला? (argument)असा सवाल करत या क्षुल्लक कारणावरून मुलींमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्यातील येरवडा येथील नेताजी शाळेच्या परिसरात हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री दहा साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास? असा जाब विचारत दोन मुलींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद वाढून त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. (argument) त्यानंतर या वादात आणखी काही मुली सामील झाल्या. शुल्लक कारणांवरुन झालेल्या वादात दोन मुलींच्या टोळ्या आपापसात भिडल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय. हे दोन गट एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापासून लाथाबुक्क्या, एकमेकींनी गलिच्छ शिव्या देण्यापर्यंत पोहोचले. हा सगळा तमाशा पाहून नागरिक(argument) थबकवले आणि संताप व्यक्त केला.

हेही वाचा :
‘1 कोटी बहिणींना लखपती….’, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार?