आजकाल पुरुष आणि महिला ब्युटी ट्रीटमेंटसाठी सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जातात.(parlors)त्यापैकी एक म्हणजे दाढी करणे किंवा शेव्हिंग. बहुतांश लोकांना ही एक साधी आणि सुरक्षित प्रक्रिया वाटते. मात्र यामध्ये लपलेला गंभीर धोका फारसा लक्षात घेतला जात नाही. त्यावेळेस न्हावी वापरत असलेले रेझर किंवा शेव्हिंग करताना वापरली जाणारी इतर उपकरणे योग्यरित्या स्वच्छ केली नसतील, तर ती संसर्गजन्य आजारांचा प्रसार करू शकतात. हे आजार थेट आपल्या यकृतावर परिणाम करतात आणि कालांतराने ते जीवघेणे ठरू शकतात.

शेव्हिंगच्या वेळी रेझर अनेक ग्राहकांसाठी वापरले गेले तर रक्त त्वचेच्या माध्यमातून विषाणू शरीरात जाऊ शकतात. त्यापैकी सर्वात धोकादायक उदाहरण म्हणजे हिपॅटायटीस बी आणि सी. हे विषाणू थेट यकृताला हानी पोहोचवतात. कालांतराने ते यकृत सिरोसिस किंवा अगदी यकृताच्या कर्करोगालाही कारणीभूत ठरू शकतात.(parlors)तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा या बाबतीत इशारा देतात. यामध्ये अनेक रुग्ण यकृताच्या विषाणूंनी बाधित झाल्याचे दिसून येते आणि त्यांचा इतिहास घेतल्यावर हे स्पष्ट होते की त्यांनी सार्वजनिक सलूनमध्ये दाढी केली होती. जर उपकरणे स्वच्छ नसतील तर विषाणूला शरीरात प्रवेश करण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दाढी करणे ही एक साधी गोष्ट असली तरी ती घाणेरड्या उपकरणांमुळे जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे सलूनमध्ये रेझर आणि उपकरणे स्वच्छ केली आहेत का हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.(parlors) शक्य असल्यास स्वतःची वैयक्तिक उपकरणे वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. थोडीशी जागरूकता आणि सावधगिरी ठेवल्यास यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवाचे रक्षण करता येऊ शकते. शेवटी, आपले आरोग्य आपल्या हातात आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिला मोठा झटका
बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल
चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज