कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटाने मनसेला मोठा झटका दिला आहे(politics).

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये राजन मराठे (माजी नगरसेवक, मनसे), ज्योती राजन मराठे (माजी नगरसेविका, मनसे), किशोर कोशिमकर (मनसे उप शहराध्यक्ष), सुरज मराठे (मनसे विद्यार्थिसेना), रविंद्र बोबडे (मनसे विभाग सचिव), संजय तावडे (मनसे उपविभाग प्रमुख), केतन खानविलकर (मनसे शाखा अध्यक्ष), सुधीर थोरात (एकता मित्र मंडळ माजी अध्यक्ष) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.
याशिवाय, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बाबाजी पाटील (माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) तसेच ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन हेही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विधानसभेत जसा पाठिंबा मिळाला, तसाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आम्हाला यश मिळेल. आम्ही कधीही विकासात राजकारण केलेले नाही. आमचा अजेंडा हा फक्त महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत. या विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत.”

शिंदे पुढे म्हणाले, “नगर विकास खात्यासह महाराष्ट्रात अनेक खाती अग्रस्थानी आहेत. राज्यात उद्योग, गुंतवणूक आणि स्टार्टअप वाढत आहेत. जीडीपीमध्ये महाराष्ट्र नंबर वनवर आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आम्ही टीम म्हणून काम केलं आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला झाला(politics). आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू आहे आणि आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.”
हेही वाचा :
बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल
चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज
नागरिकांनो अलर्ट! ‘या’ आठवड्यात बँका तब्बल ४ दिवस बंद राहणार