सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ (video)मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रेमी जोडपे चालत्या बाइकवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमॅन्स करताना दिसत आहे. मात्र, हा ‘रोमॅन्स’ त्यांना चांगलाच महागात पडला असून, नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी तरुणावर तब्बल ५३,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये (video)एक तरुण पांढऱ्या शर्ट आणि काळ्या पँटमध्ये बाइक चालवत असताना, त्याच्या टँकवर बसलेली मुलगी त्याला मिठी मारताना दिसते. या स्टंटदरम्यान दोघांनीही ट्रॅफिक नियमांची पायमल्ली केली. हे दृश्य नागरिकांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केले, ज्यामुळे ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेत हे प्रकरण आलं.

यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत, तरुणावर धोकादायक वाहनचालक, हेल्मेट न घालणे आणि ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन अशा अनेक कलमांतर्गत दंड लावला. पोलिसांनी स्पष्ट केले की, तरुणाने केवळ स्वतःच्या नव्हे तर सोबतच्या मुलीच्या जीवाला देखील धोका निर्माण केला होता.

सोशल मीडियावरही लोकांनी या जोडप्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं, “या अॅक्शनवर पोलिसांनी परफेक्ट रिअॅक्शन दिली.” तर दुसऱ्या युजरने कमेंट केली, “त्यांना चांगलाच धडा शिकवला गेला.”

हेही वाचा :

नागरिकांनो अलर्ट! ‘या’ आठवड्यात बँका तब्बल ४ दिवस बंद राहणार

परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या गोळ्या; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *