अभिनेत्री (Actress)परिणिती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. तिने चोप्रा आणि चड्ढा कुटुंबामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण परिणिती चोप्रा ही कायमच चर्चेत राहिली आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. परिणीती चोप्राने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा (Actress)यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर परिणिती गूडन्यूज कधी देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता परिणितीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गूड न्यूज दिली आहे.परिणिती आणि राघव यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 1+1=3 असं लिहिली आहे. तसेच पुढे राघव आणि परिणितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती दोघेही चालताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत परिणितीने, ‘आमचे छोटेसे जग… देवाच्या कृपेने लवकरच येणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर परिणितीने शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी परिणिती आणि राघव यांचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी परिणितीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी लग्न केले आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. उदयपूरमध्ये दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं.

राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. अनेकवर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आा त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.
हेही वाचा :
नागरिकांनो अलर्ट! ‘या’ आठवड्यात बँका तब्बल ४ दिवस बंद राहणार
परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या गोळ्या; १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू