विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील गळती थांबण्याचं नाव घेत नाही. आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या(political circles) प्रदेश उपाध्यक्षा आणि आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये(political circles) प्रवेश केलेल्या आणि लगेचच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या शिंदे यांनी अचानक राजीनामा दिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, त्यांचा पुढील राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीसमोर वाढतं आव्हान :
महाविकास आघाडीतील नेत्यांची महायुतीकडे होणारी सततची पलायनं शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस दोघांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला असून, त्याचा फटका सर्वाधिक ठाकरे गटाला बसला आहे. आता प्रतिभा शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसलाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीची तयारी, महाविकास आघाडीचे अस्पष्ट धोरण :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं की, स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत. यामुळे भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गट आधीच मोर्चेबांधणीला लागले आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीने या निवडणुकांबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, घटक पक्षांना लागलेली गळती थांबवणे हे सध्या महाविकास आघाडीसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. महायुतीमधील ‘इनकमिंग’चा वेग पाहता, या गटाला येत्या निवडणुकांमध्ये याचा थेट फायदा होऊ शकतो.
हेही वाचा :
रोहित – विराट ODI क्रिकेटला करणार अलविदा? 2027 च्या विश्वचषकापूर्वी होणार मोठा निर्णय
भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय मुलीची…
भर रस्त्यात पत्नीची पतीला बेदम मारहाण; केस पकडले अन् लगावली कानशिलात, Video Viral