सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही भांडणांचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला भर रस्त्यात मारहाण करत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे दोघांचा प्रेम विवाह झाला आहे, मात्र पतीने पत्नीसोबत असे काही केलं आहे की तिने भर रस्त्यात त्याला मारयाला सुरुवात केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिलेने आपल्या नवऱ्याचे केस ओढून धरले आहेत.

तसेच महिला आपल्या नवऱ्याला सटासट कानाखाली मारत आहे. व्हिडिओच्या(Video) कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, नवऱ्याने तिचा मोबाईल फोडला यामुळे त्याला मार पडत आहे. अगदी पोलिसांनी देखील भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील महिलेचा राग सहन करावा लागला आहे.

पोलिसांनी सांगितले की महिला नशेमध्ये देखील होती. तिच्या नवऱ्यानेच तिला दारु पाजली होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे भांडण बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा प्रेम विवाह झाला होता. महिलेला नवऱ्याने मारहाण देखील केली, तिला दारु पाजली तसेच तिचा फोनही तोडला. या कारणामुळे महिला आपल्या पतीला मारत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KumudiniGudiya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजरो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव

रोहित – विराट ODI क्रिकेटला करणार अलविदा? 2027 च्या विश्वचषकापूर्वी होणार मोठा निर्णय

भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय मुलीची…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *