गणेशोत्सवाची(Ganeshotsav) धुमधाम सुरू आहे. सगळीकडे बाप्पांच्या मूर्तींचं आगमन सोहळे मोठ्या जल्लोषात पार पडताय. बाप्पााच्या स्वागतासाठी आकर्षक आरासही केली जातेय. अशातच अनेक सेलिब्रिटींच्याही घरात बाप्पा विराजमान होतो. त्यापैकीच एक म्हणजे, बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टी . दरवर्षी शिल्पाच्या घरी मोठ्या दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, यंदा मात्र तिच्या घरातल्या 22 वर्षांच्या परंपरेत खंड पडणार आहे. 2002 पासून शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंबीय मोठ्या मनोभावे गणरायाची प्रतिष्ठापना करुन मनोभावे सेवा करतात. पण, यंदा मात्र शिल्पा शेट्टी गणेशोत्सव साजरा करणार नाही.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीनं म्हटलं आहे की, “मित्रांनो, तुम्हाला कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की, कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा आम्ही गणेशोत्सव(Ganeshotsav)साजरा करणार नाही. परंपरेनुसार, आम्ही 13 दिवसांचं सुतक पाळत आहोत आणि म्हणून कोणतेही धार्मिक उत्सव घरात साजरे होणार नाहीत…”
शेट्टी कुटुंबात कुणाचंही निधन झालेलं नाही. मिडिया रिपोर्टनुसार, राज कुंद्राच्या कुटुंबातील कुणा एका जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. शिल्पानं पोस्टच्या शेवटी कुंद्रा कुटंबीय असं लिहिलं आहे. त्यामुळे कुंद्रा कुटुंबातील कुणा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केवळ शिल्पा शेट्टीचं नाही तर विवेक ओबेरॉय, गोविंदा, श्रद्धा कपूर, सोनू सूद, ईशा कोपीकर आणि सलमान खान देखील ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला त्यांच्या घरी आणतात. गणेश चतुर्थीच्या वेळी या सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
हेही वाचा :
आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….!
आज हरतालिकेचा दिवस राशींसाठी भाग्याचा!…
VI App वर गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट सुरु,….