बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विधवा(Widow) महिलेने आपल्या दिरासह सासू-सासऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, तिचा दिर तिच्यासोबत अश्लील वर्तन करायचा आणि जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा सासू-सासऱ्यांनीही धक्कादायक प्रतिक्रिया देत तिच्यावर लग्नाचा दबाव टाकला.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी ती आपल्या मुलीसोबत बेडरूममध्ये बसलेली असताना तिचा दिर आत आला आणि तिच्याशी लग्न करण्याची मागणी केली. त्यानंतर त्याने छेडछाड सुरू केली. महिलेने विरोध केल्यावर तिच्या हातातील बांगडी तुटली आणि रक्तस्राव झाला. ती ओरडताच सासरे आणि सासू खोलीत आले. मात्र, त्यांनी धक्कादायक पवित्रा घेत सांगितले की, “याची मागणी मान्य कर. नाहीतर आम्ही तुला मारून टाकू आणि आत्महत्या दाखवून सुटून जाऊ.”
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, तिच्या पतीने २०२२ मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली होती. मात्र, ती त्या खटल्यातून निर्दोष सुटली. आता मात्र दिराने सतत लग्नासाठी दबाव टाकत तिला छेडले असल्याचा तिचा आरोप आहे.

या गंभीर प्रकरणी पोलिसांनी दिर, सासू आणि सासरे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासाची जबाबदारी एसआय मुरलीधर मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे(Widow).
हेही वाचा :
या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत
मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी