दिल्ली प्रीमियर लीग दरम्यान वेस्ट दिल्ली लायंसचा कर्णधार नितीश राणा(sports news) आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्जचा गोलंदाज दिग्वेश राठीमध्ये जबरदस्त भांडण झालं. क्वालिफायर सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर दोघांना शिक्षा म्हणून दंड सुद्धा करण्यात आला. या वादानंतर नितीश राणाने पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे. त्याने प्रथम म्हटले की, माझ्या एकट्याचे ऐकणे चुकीचे ठरेल कारण मी फक्त माझी बाजू मांडेन. तो पुढे म्हणाला की, जर कोणी त्याला डिवचलं तर मी गप्पा बसणार नाही.

नेमकं काय घडलं होतं?
नितीश राणाने दिग्वेश राठीला षटकार ठोकला आणि मग गोलंदाजांच ट्रेडमार्क नोटबुक सेलिब्रेशन बॅटचा इशारा दिसून केलं. यामुळे साउथ दिल्लीचे खेळाडू नाराज झाले आणि काही अपशब्द बोलू लागले. खेळाडू जवळजवळ एकमेकांना मारण्याच्या बेतात होते. परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वीच, साउथ दिल्ली सुपरस्टार्सच्या इतर खेळाडूंनी त्यांना एकमेकांपासून वेगळे केले.
नितीश राणाने (sports news)सामना संपल्यावर पीटीआयशी बोलताना म्हटले की, ‘हे खूप चुकीचं ठरेल कारण मी फक्त माझी बाजू मांडेल. आम्ही दोघेही आपापल्या संघांसाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न करत होतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण क्रिकेटच्या खेळाचा आदर केला पाहिजे. त्यांच्याकडूनच गोष्टी सुरु झाल्या होत्या.
मी हे नाही सांगणार की कसं पण जर कोणी मला चिथावण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसणार नाही. मी नेहमीच असेच क्रिकेट खेळलो आहे. मी षटकार मारू शकतो आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ शकतो. मी अनेक भांडणांमध्ये सहभागी झालो आहे पण मी कधीही त्या सुरू केल्या नाहीत. जर कोणी मला चिथावण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही आणि योग्य उत्तर देईन’.
राणा आणि राठीला ठोठावला दंड :
नितीश राणा आणि दिग्वेश राठी या दोघांना मैदानात केलेल्या भांडणामुळे लीगकडून शिक्षा देण्यात आली. नितीश राणा आणि दिग्वेश राठीने स्पर्धेच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं आणि मॅच फी कापण्यात आली. लेव्हल 2 च्या उल्लंघनासाठी राठीला त्याच्या मॅच फीच्या 80% दंड ठोठावण्यात आला, तर लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी राणाला 50% दंड ठोठावण्यात आला. सामन्यात नितीश राणाने 55 चेंडूत 134 धावा करून संघाला 202 धावांचे आव्हान पूर्ण करून विजय मिळवून दिला.
हेही वाचा :
‘कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं…’ सख्ख्या मैत्रीणीला गमावल्याने प्रार्थना भावुक
गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका!
Dream11 पेक्षाही मोठी डील, टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचा लोगो झळकणार?