सोलापूर : सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा(poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल संध्याकाळी जेवणानंतर प्रकृती बिघडल्याने तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होऊ लागल्याने एकामागून एक अनेक जण आजारी पडले. त्यापैकी १७ जणांवर विशेष उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या सुमारे १,४०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी एवढ्या मोठ्या संख्येने विषबाधा झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा(poisoning) झाल्याचा संशय वर्तवला जात असून अचूक कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासनासह संबंधित विभाग कार्यरत आहेत.

या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रातील स्वयंपाकगृह व अन्नपुरवठा यंत्रणेच्या तपासणीची मागणी होत आहे. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेसाठी पुढील काळात काटेकोर उपाययोजना करण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.
हेही वाचा :
प्रसिद्ध शास्त्रीय गायकाचा घटस्फोट, 17 वर्षाचा संसार मोडला
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?
सप्टेंबर महिना या राशींना सौभाग्य मिळवून देणार….