जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास केवळ(application)तीन दिवस उरले असून, आता निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत. २१ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सोमवारपासून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रत्यक्षात केवळ एकच अर्ज दाखल झाला असला, तरी इच्छुकांची हालचाल वाढू लागली आहे.महापालिका निवडणुकीचा धुरळा पूर्णपणे खाली बसण्याआधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य यांसह विविध पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्राथमिक स्वरूपात जागावाटपावर चर्चा झाली आहे.

मात्र, अद्याप अनेक ठिकाणी उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात (application)पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत १०९३ उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली आहे. तरीही प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवार सध्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.२२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार असून, २७ जानेवारी हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी गट व गणनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी मिळणार (application)असल्याने अनेक उमेदवारांनी आतापासूनच मतदारसंघात संपर्क आणि तयारी सुरू केली आहे.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीकडे अनेक इच्छुकांचा कल असून, काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यास विरोधी पक्षात प्रवेशाचे पर्यायही खुले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आता व्हॉट्सअॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या
यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?